Please visit MVS YouTube Channel "Topiwalla MVS Events" दहावी SSC पहिली बॅच आणि अकरावी SSC शेवटची बॅच सुवर्ण महोत्सवी वर्षात माजी विद्यार्थी मेळावा २०२६ साठी कार्यक्रम सुचवा. संघटनेच्या ९५२९७८६७८१ क्रमांकावर संदेश पाठवा. Keep an eye on this space for admission in school for 2026 batch! कोणी वर्गबंधू शाळासोबती यांच्याशी संपर्क असेल तर त्याला / तिला संघटनेचा सदस्य होण्यास उद्युक्त करा. मदतीसाठी संघटना तयार आहेच, संपर्क करा ९५२९७८६७८१ क्रमांकावर. आपले मालवण शहर स्वच्छ ठेवा. मालवणचे निसर्गसौंदर्य आणि पर्यावरण अबाधित राखा.

About Us

माजी विद्यार्थी संघटना – कार्यकारिणी

श्री. रघुनाथ शेवडे (१९७१)
श्री. रघुनाथ शेवडे (१९७१)

अध्यक्ष

मालवण

श्री. उमेश धारगळकर (१९७५)
श्री. उमेश धारगळकर (१९७५)

सह-अध्यक्ष

मुंबई

श्रीमती श्रुती संकोळी (१९८०)
श्रीमती श्रुती संकोळी (१९८०)

सचिव

पुणे

डॉ. आश्विन दिघे (१९९३)
डॉ. आश्विन दिघे (१९९३)

कोषाध्यक्ष

मालवण

श्री. सुनील वझे (१९८४)
श्री. सुनील वझे (१९८४)

सह-कोषाध्यक्ष

मुंबई

श्री. नंदन देसाई (१९७५)
श्री. नंदन देसाई (१९७५)

सदस्य

मालवण

श्रीमती उमा आजगावकर धुरिया (१९७५)
श्रीमती उमा आजगावकर धुरिया (१९७५)

सदस्या

मुंबई

श्रीमती आसावरी बर्वे (१९८०)
श्रीमती आसावरी बर्वे (१९८०)

सदस्या

पुणे

श्री. अरविंद परुळेकर (१९८१)
श्री. अरविंद परुळेकर (१९८१)

सदस्य

मुंबई

श्री. दिगंबर परुळेकर (१९७७)
श्री. दिगंबर परुळेकर (१९७७)

सदस्य

पुणे

श्री. प्रमोद मोहिते (१९७७)
श्री. प्रमोद मोहिते (१९७७)

सदस्य

मालवण

image
मा. वि. स.

टोपीवाला हायस्कूल मालवण माजी विद्यार्थी संघटना

मा. वि. स. ही टोपीवाला हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थ्यांसाठी 1991 मध्ये नोंदणी करून स्थापन केलेली एक स्वायत्त संस्था आहे. यांत मालवण एज्युकेशन सोसायटीद्वारे चालविल्या जाणार्‍या सर्व शैक्षणिक संस्थांचे 16 वर्षावरील माजी विद्यार्थी सभासद होऊ शकतात. मा. वि. स. ची स्वतंत्र घटना (नियम आणि नियमावली) असून तिचे कामकाज संस्थेच्या कार्यकारी मंडळातर्फे पाहिले जाते. सध्या या कार्यकारिणी मध्ये मालवण, मुंबई आणि पुणे मधून 11 सदस्य आहेत. आजमितीस सभासद संख्या 495 एवढी आहे. संस्थेचे कामकाज हे माजी विद्यार्थीनी देणग्या गोळा करुन बांधलेल्या व्यंकटेश हरी सांगावकर ज्ञानमंदिर या वास्तूतील कार्यालयातून चालते. "माजी विद्यार्थी" हा MVS चा केंद्रबिंदू असून त्यांच्या मदतीने माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी आणि मालवण शहर यांच्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्यांत मेळावे, सहली, कार्यशाळा इत्यादींचा समावेश आहे. Topiwalla MVS Events या नावाचे MVS चे यूट्यूब चॅनेलही आहे.

MVS ची उद्दिष्टे

  1. जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणून सभासद संख्या वाढविणे
  2. संघटना चालविण्यासाठी आणि तिची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निधी गोळा करणे, यासाठी तिकिट लावून सांस्कृतिक किंवा इतर (fundraiser) कार्यक्रम आयोजित करणे, तसेच MVS च्या वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी देणग्या गोळा करणे
  3. सभासदांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, कौशल्य प्रशिक्षण, सहली इ. आयोजित करणे, आणि त्यासाठी निधी, देणग्या गोळा करणे
  4. MES तर्फे चालविल्या जाणाऱ्या शाळांमधील सध्याच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी काही प्रशिक्षण देणे किंवा आर्थिक मदत देणे यासाठी सभासदांकडून काही प्रस्ताव आलास त्यावर विचार करून, योग्य वाटल्यास MES कडे पाठविणे आणि तो मंजूर झाल्यास संबंधित सभासदांना शक्य तितकी मदत करणे
  5. MES तर्फे चालविल्या जाणाऱ्या एखाद्या शाळेने जर त्यांच्या एखाद्या विशिष्ट प्रकल्पासाठी MVS कडे कोणतीही मदत मागितली तर त्यावर विचार करून, योग्य वाटल्यास आणि शक्य असल्यास ती मदत करणे
  6. मालवण शहरासाठी किंवा शहरातील इतर विद्यार्थ्यांसाठी MVS सभासदांकडून किंवा शहरातील इतर संस्थांकडून शैक्षणिक, क्रीडा, कला किंवा सांस्कृतिक विकासासंबंधी काही सामूहिक प्रस्ताव पुढे आला तर त्यावर विचार करून योग्य वाटल्यास शक्य ते योगदान देणे